सावंतवाडी / प्रतिनिधी:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रातील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र अभ्यासक्रमात अनुजा यशवंत कुडतरकर यांनी ९७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कणकवली येथील सुप्रिया नथू तिवले (९४.५०) यांनी द्वितीय तर खारेपाटण येथील अस्मिता अशोक गिडाळे (९३) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. एकूण २४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ प्रविष्ट झाले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती.
या विद्यार्थ्यांना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, माजी केंद्र संयोजक संदीप तेंडोलकर, ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर, शिवप्रसाद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
अभ्यासकेंद्र प्रमुख रमेश बोंद्रे अध्यक्ष ॲड. दीपक नेवगी, कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, डाॅ. जी. ए. बुवा, केंद्र संयोजक राजेश मोंडकर
यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Previous Article‘कायदा सर्वांना सारखाच’, सौरभ गांगुलीला कोर्टाने ठोठावला दंड
Next Article पीएम पोषण योजनेला मंजुरी









