ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या वुहानमध्ये 13 प्रकारचे कोरोना विषाणू आढळले असून, त्याचा प्रसार प्राथमिक अंदाजापेक्षा 500 पट अधिक झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
कोरोना उगमस्रोताच्या चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) पथक 3 फेब्रुवारीला वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये दाखल झाले आहे. कोरोनाचा पसार आणि प्रकाराबाबत या पथकाने अभ्यास केला.
WHO च्या पथकातील संशोधक पीटर इमरबॅक यांनी म्हटले आहे की, 17 नोव्हेंबर 2019 रोजी चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलला. त्यानंतर वुहानमध्ये कोरोनाचा प्रसार वेगात झाला. आमच्या पथकाने कोरोनाच्या जेनेटिक्सचा अभ्यास केला. त्यानुसारडिसेंबरमध्येच वुहानमध्ये 13 प्रकारचे कोरोना विषाणू आढळल्याचे समोर आले.