वारणानगर / प्रतिनिधी
पुनाळ ता. पन्हाळा येथील वीर ज्योत्याजी केसरकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी आराखडा व अंदाजपत्रक सादर करा यासाठी निधी उपलब्द करून देण्याची ग्वाही राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी भेटी प्रसंगी दिली.
वीर ज्योत्याजी केसरकर हे स्वराज्य निर्मितीत छत्रपती संभाजीराजे यांचे विश्वासू सेवक म्हणून अखेरपर्यन्त निष्ठेने व विश्वासाने लढले त्यांना वीरगती पावल्यावर त्यांच्या मूळ गांवी पुनाळ येथे त्यांचे स्मारक पन्हाळ गडावरील तीन दरवाज्यातून दिसावे असे बांधण्यात आले होते आज देखील स्मारक प्रेरणा देत उभे आहे या स्मारकास अध्यक्षा ज्योती ठाकरे यानी भेट देवून वीर केसरकर यांना अभिवादन केले.
ग्रामपंचायत अथवा संबधीत विभागा मार्फत वीर ज्योत्याजी केसरकर यांच्या स्मारकाचा विकास, सुशोभिकरण या कामाचे आराखडा व अंदाजपत्रक आपल्याकडे सादर करावे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना भेटून थेट निधी उपलब्द करून देण्याचे आश्वासन अध्यक्षा ठाकरे यानी यावेळी दिले.
पुनाळ येथील मारूती पाटील, तसेच माविमचे विभागीय संनियत्रण अधिकारी विलास बच्चे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंझाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Articleअंजनगाव येथे बिबट्याने घेतला दुसरा बळी
Next Article वैभववाडीत नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम









