प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील वीरशैव को – ऑप बँकच्या चेअरमनपदी अनिल बाबूराव सोलापूरे व व्हाईस चेअरमनपदी रंजना कृष्णात तवटे यांची निवड झाल्याबद्दल गोकुळ दूध संघाच्यावतीने संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते संचालक मंडळ सभेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱयांना संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सोलापूरे म्हणाले, गोकुळ ही जिल्ह्यातील दूध उत्पादकांची अर्थवाहिनी आहे. दूध उत्पादकांसाठी गोकुळने केलेले काम कौतुकास्पद आहे. गोकुळने केलेल्या या सत्कारामुळे बँकेचे कामकाज करण्यासाठी आम्हास निश्चितच प्रोत्साहन मिळेल. बँकेकडून गोकुळचे कर्मचारी, वाहतूक ठेकेदार यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रणजीतसिंह पाटील, विश्वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, बाळासो खाडे,रामराज देसाई-कुपेकर, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, अमरीषसिंह घाटगे, सत्यजित पाटील, ऊदय पाटील, बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील आदी.









