हिस्सा खरेदीसाठी विविध कंपन्यांना रस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपमधील कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आपला राजधानीच्या ठिकाणी असणारा वीज व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहे. दिल्लीमधील बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड (बीआरपीएल) आणि बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेडमधील (बीवायपीएल) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा 51-51 इतका हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपन्यांची पूर्ण हिस्सेदारी विकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सदरच्या घोषणेनंतर इंस्टीटय़ूशनल इन्वेस्टर सीडीपीक्मयू, एक्टिस एलएलपी आणि ब्रुकफील्ड असेट्स मॅनेजमेन्ट या कंपन्यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमधील वीज वितरण व्यवसाय खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसऱया बाजूला ग्रीनको एनर्जी होल्डिंग्स, इनेल ग्रुप, आय स्कावयर्ड कॅपिटल, टोरंट पॉवर ऍण्ड वेड कॅपिटल गुप एलएलसी आदी कंपन्यांनीही खरेदीसाठी सकारात्मकता दर्शवली आहे.
राजधानी दिल्लीमधील मुख्य वीज वितरण कंपन्यांमध्ये दिग्गज असणारी बीएसईएस आणि बीएसइएस यमुना या कंपन्यांकडे जवळपास 44 लाख ग्राहकांची संख्या आहे. दिल्लीत 2002 मध्ये वीज वितरणात खासगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत वीज वितरणात तीन कंपन्या कार्यरत आहेत.









