प्रतिनिधी / कोल्हापूर
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या 19 मार्चला राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. तसेच उद्या, सोमवार पासून सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री यांचे पुतळे जाळा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद पडल्याने लाखो लोकांचा रोजगार बुडाला. हजारो कामगारांच्या नोकर्या गेल्या. यातच लॉकडाऊन काळात महावितरण कडून वाढीव वीज बिले देण्यात आली. यामुळे जनता अक्षरश: मेटीकुटीला आली आहे. ही विज बिले माफ करावीत या मागणीसाठी गेल्या जून महिन्यापासून जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहे. सरकार वेळोवेळी सांगत आहे की, आम्ही जनतेला दिलासा देणार आहोत. मात्र, अधिवेशन संपले तरीही कोणताही निर्णय झालेला नाही. अधिवेशन संपताच वीज कनेक्शन कापण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सरकार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ करत आहे. म्हणून येत्या 19 मार्च रोजी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको करून आम्ही सरकारच्या या धोरणाविरोधात संघर्ष करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









