वारणानगर / प्रतिनिधी
फॅब्रिकेशन व्यवसायाच्या विज कनेक्शनसाठी एक हजाराची लाच स्वीकारताना शिरीष शेटे या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी पंटरसह वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता साईनाथ सनगर या दोघाना ताब्यात घेतल आहे.
पन्हाळा तालुक्यातील देवाळे परिसरात एका व्यक्तीला फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्याने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नवीन वीज कनेक्शन जोडणीसाठी अर्ज केला होता. यावेळी येथील कनिष्ठ अभियंता साईनाथ सणगर याने तक्रादाराकडे १ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. आज कनिष्ठ अभियंता साईनाथ सणगर यांच्यावतीने लाच स्वीकारण्यासाठी आलेल्या शिरीष शेटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता साईनाथ सणगर आणि पंटर शिरीष शेटे या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवन्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर, विकास माने, कृष्णत पाटील, नवनाथ कदम, सूरज अपराध यांनी केली आहे.