भ्रष्टाचार व कामचुकारपणा थांबविणसाठी निर्णय मंत्री निलेश काब्राल
प्रतिनिधी/ पर्वरी
वीज खात्यात लोकांच्या वाढत्या तक्रारी व लोकांची कामे वेळेत होत नसल्याने आता वीज खात्यातर्फे ऑनलाईन अर्ज करण्याची सोय केली आहे. 16 नोव्हेंबरपासून विद्युत खात्यातर्फे नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज लोकांना करावे लागणार आहे, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पर्वरीत सचिवालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
घरघूती वीज जोडणीसाठी लोकांचे अर्ज कार्यालयामध्ये पडून राहतात लोकांना वेळेवर वीज जोडणी मिळत नाही, वीज खात्याचे अभियंते कर्मचारी भ्रष्टाचार करतात अशा तक्रारी येत असायचा. त्यामुळे वीज खात्याने हा निर्णय घेतला आहे. लोकांनी वीज खात्याच्या संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे. तसेच तुम्हाला हवे त्या वेळी वीज कर्मचारी तुमच्या घरी येऊन वीज जोडणी करणार आहे, असे ते म्हणाले
वीज खात्यासंदर्भात श्वेत पत्रिका माझ्या वेबसाइर्टवर जारी केली आहे. यात सर्व तक्रारींचे स्पष्टीकरण दिलेले आहे. लोकांना दिशाभूल करण्याचे काम हे विरोधी पक्ष करत आहे, असे यावेळी मंत्री काब्राल यांनी सांगितले.
एक रकमी कर्ज फेड 1 डिसेंबर पासून
ज्या लोकांची वीज थकबाकी पडून आहे तो कर्ज फेड करण्यासाठी एक रकमी कर्ज फेड योजना वीज खात्यातर्फे 1 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. फक्त एक महिना असणार आहे. वीज खात्याच्या संकेस्तळावर यांची सर्व माहिती उपलब्ध आहे. यासाठी कुणाकडे जाण्याची गरज नाही. काही जणाचे लाखो रुपयाचे वीज बीव थकीत आहे ते परत फेड करण्यासाठी वीज खाते प्रयत्न करत आहे असेही काब्राल म्हणाले.
लग्न नोंदणीही आता ऑनलाईन
लग्न नोंदणीही आता ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे आता सोयऱयात झाल्यावर मुला मुलींना मामलेदार कार्यालयात जाऊन फेरफटका मारण्याची गरज भासणार नाही ऑनलाईन अर्ज भरावे नंतर आपल्याला वेळ मिळेल तेव्हा सर्व कगदपत्रे घेऊ नोंदणी करण्यासाठी कार्यालयात जावे त्यामुळे लोकांचा वेळही वाचणार आहे, कामेही लवकर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
काही लोक व बिगर सरकारी संस्था पर्यावरणाच्या नावाने सर्व कामाना अडथळा आणत आहे. सरकार पर्यावरणावर गंिभर आहे. ज्या प्रमाणे काहीजण 54 मेट्रीक टन कोळसा येणार असे सांगून लोकांची दिशभूल करत आहे. तसे आम्ही होऊ देणार नाही वेळ पडल्यास आम्ही हा कोळसाही बंद करु शकतो. तसेच मोले बचावसाठी लोक आंदोलन करत आहे. सध्या गोव्यात वीज तयार होत नसल्याने आम्हाला बाहेरील राज्यातील वीज आणावी लागते. आता रेल्वे वीजवर चालणार आहे यासाठी आम्हीला वीजची गरज भासणार आहे. याचा विचारही लोकानी करावा. पर्यावरणाचे जतन करुन विकासाला चालना देणे गरजेचे आहे. यासाठी लोकांचे सहकार्य हवे असेही काब्राल म्हणाले.









