सावंतवाडी/वार्ताहर-
नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे भारनियमन केल्याच्या रागातून वीज वितरण कंपनीच्या सावंतवाडी कोलगाव येथील उपकेंद्रात घुसून वीज कर्मचारी व सुरक्षारक्षक या दोघांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रणेश बिद्रे व अमित वेंगुर्लेकर यांना शनिवारी सावंतवाडी दिवाणी न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयितांतर्फे अॅड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले. कर्मचारी आनंद गावडे, सुरक्षारक्षक चौरंग सावंत यांना वीज वितरण कार्यालयात घुसून जमावाने मारहाण केली होती. याप्रकरणी गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यातील प्रणेश बिद्रे व वेंगुर्लेकर या दोघांना सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद करत आहेत.









