4 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत
प्रतिनिधी/ बेळगाव
वीजबिल थकविल्याने बेळगाव तालुक्मयातील 14 गावांचा वीजपुरवठा हेस्कॉमने तोडला आहे. या 14 गावांमधील पथदीप बंद असल्याने ही गावे अंधारात सापडली आहेत. वारंवार सूचना करूनदेखील ग्राम पंचायतीने थकविलेले वीजबिल न भरल्याने अखेर हेस्कॉमने हा निर्णय घेतला आहे. यातील काही ग्रांम पंचायतींनी शुक्रवारी थकीत वीजबिलापैकी काही रक्कम भरल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
ग्राम पंचायत हद्दीत पथदीप व पाणीपुरवठय़ासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा केला जातो. परंतु बेळगाव तालुक्मयातील बऱयाचशा ग्राम पंचायतीचे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वारंवार कळवूनदेखील बिल भरले जात नसल्याने हेस्कॉमने कठोर निर्णय घेतला आहे. हेस्कॉमच्या ग्रामीण उपविभाग 2 अंतर्गत येणाऱया 14 ग्राम पंचायतींचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. यामुळे या गावांमध्ये पथदीपांअभावी अंधार झाला आहे.
एकूण 3 कोटी 5 लाख रुपयांचे वीजबिल ग्राम पंचायतींनी थकविले आहे. यामध्ये होनगा, काकती, वंटमुरी, कंग्राळी बुदुक, निलजी, सुळेभावी, बाळेकुंद्री बुद्रुक, मारिहाळ, मास्तमर्डी यासह इतर गावांचा समावेश आहे. वेळोवेळी विनंती करूनदेखील ग्रा. पं. ने बिल न भरल्यामुळेच हेस्कॉमने हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.









