आचरा / प्रतिनिधी-
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मालवण येथील आचरा परिसरात वीज वाहिन्या तुटून, खांब मोडून मी वितरणचे नुकसान झाले होते.विजेविना आचरा परिसर अंधारात होता. मात्र आचरा येथील वीज वितरणाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसरात्र एक करत अवघ्या दोन दिवसात 90 टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कार्याला सलाम करत जयप्रकाश उर्फ बाबू परुळेकर मित्र मंडळाकडून त्यांना भेटवस्तू देत गौरव करण्यात आला.
यावेळी जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्ते आचरा वीज वितरणाचे अधिकारी दीपक मुगडे, अक्षय पवार, कॉन्ट्रॅक्टर गणेश गोवेकर, महादेव गावकर, संदिप पांगम, मुरारी जांभळे, विजय भाट, विठ्ठल साळकर, मंगेश परब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आचरा गावचे ग्रामोपाध्ये निलेश सरजोशी, आशिष बागवे, अभिजित सावंत, संदीप नलावडे, निखिल ढेकणे, पंकज आचरेकर, शैलेश मुणगेकर, नरेंद्र कोदे, महेश शेट्ये, कृष्णा तारकर, भाई नलावडे यावेळी उपस्थित होते.









