ओटवणे /प्रतिनिधी-
विश्व हिंदू परिषदेच्या सावंतवाडी प्रखंडाच्यावतीने सातुळीआणि बावळाट गावातील गरजूंना धान्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी विहिंप जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातावळेकर, विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, तालुका कार्यकरिणीतील सदस्य सुनील सावंत आणि सातुळी व बावळाट गावातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी या दोन्ही गावातील गरजुंसह उपस्थितांनी विश्व हिंदू परिषदेचे आभार मानले.









