ओटवणे/ प्रतिनिधी-
विश्व हिंदू परिषदेच्या सावंतवाडी प्रखंडाच्यावतीने ओटवणे गावातील पाच पूरग्रस्तांसह नऊ गरजूंना घरोघरी जात त्यांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विहिंप जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातावळेकर, विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, तालुका कार्यकरिणीतील सदस्य सुनील सावंत ओटवणे गावातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ओटवणे गावातील पूरग्रस्तांसह गरजुंनी व उपस्थितांनी विश्व हिंदू परिषदेचे आभार मानले.









