पुसेगाव पोलिसांकडून 43,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुसेगाव / वार्ताहर :
विसापूर ता. खटाव येथे रणपिसे वस्तीशेजारी मोकळ्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली पुसेगाव पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून 43,560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांना जुगार अड्डयाविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार पुसेगाव पोलिसांनी विसापूर ता. खटाव येथील रणपिसे वस्तीशेजारील मोकळ्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली छापा टाकला. येथे नऊ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या 9 जणांची अंगझडती व घटनास्थळी तपासणी केली असता त्यांच्याकडे रोख रक्कम 7 हजार 560 रुपये व 3 मोबाईल तसेच एक मोटरसायकल असा एकूण 43 हजार 560 रुपये कींमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला असून, या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच आरोपीही विनाकारण घराबाहेर पडल्यामुळे मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदर आरोपी यांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड असा एकूण चार हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.









