वज्राच्या प्रहाराने ज्याप्रमाणे इंद्र पर्वत फोडतो त्याप्रमाणे गदेच्या प्रहारांनी कृष्णाने प्राग्ज्योतिषपूराला वेढणाऱया पर्वतांची रांग फोडून टाकली. त्यानंतर आपल्या अमोघ बाणांनी शस्त्रांची तटबंदी छिन्नविछिन्न करून टाकली. यानंतर कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचा प्रहार केला. या ठिकाणी कृष्णदयार्णवांनी सुदर्शन चक्राचा पराक्रम वर्णन करताना अंबरिष राजा व दुर्वास ऋषि यांच्या कथेचा संदर्भ दिला आहे. कोण होता हा राजा अंबरिष? त्याचा दुर्वासांचा संबंध कसा आला? पुराणात अंबरिषाची कथा आली आहे ती अशी –
अंबरिष नावाचा एक अत्यंत शूर आणि देखणा राजा भारतवर्षात होऊन गेला. तो खूप ऐश्वर्यवान असा राजा होता. संपूर्ण पृथ्वीवर त्याचे राज्य पसरलेले होते. राजा अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. एवढा श्रीमंत असूनही राजाला कसलाही गर्व नव्हता. राजाची राहणी साधी होती. बोलणे मृदू होते, स्वभाव नम्र होता. राजा प्रजेची खूप काळजी घ्यायचा. राज्यकारभार तर तो उत्तम करायचा. न्यायनि÷tर होता. सर्व जवळ असूनही राजाचे मन कशातही गुंतलेले नव्हते. दिवस-रात्र तो देवाचे चिंतन करायचा. भगवान विष्णूचा तो परमभक्त होता. त्याच्या तोंडी सतत भगवान विष्णुचे नाव असायचे. घरी येणाऱया सर्व संतांचे, साधूंचे तो मनःपूर्वक स्वागत करायचा. सर्व संत-साधूंना तो बसायला उच्च आसन द्यायचा. त्यांची मनोभावे पूजा करायचा. त्यांची सेवा करायचा. त्यामुळे सर्व साधुसंत राजा अंबरिषवर प्रसन्न असायचे. विष्णुप्रेमामुळे राजाचा चेहरा भक्तिरसाने तेजाळत होता. राजा ऋषीमुनींना, साधुसंतांना नेहमीच नम्रपणाने म्हणायचा, हे राज्य भगवंताचेच आहे. त्याचा वरदहस्त आहे म्हणून माझ्यावर हा सुखाचा पाऊस पडतो आहे.’
राजा आणि राणी दोघेही पूजा-अर्चा करण्यात दिवसचे दिवस घालवत. एकही क्षण ते वाया घालवत नसत आणि म्हणूनच की काय पण भगवान विष्णूचे सुदर्शन-चक्र राजाच्या मागे त्याच्या रक्षणार्थ सतत फिरत राहायचे; पण राजा अंबरिषला त्याचे अजिबात भान नव्हते. तो सतत शांत असायचा.
एकदा राजा आणि राणीने द्वादशी व्रताचे उद्यापन करायचे ठरविले. वर्षभर हे द्वादशीचे व्रत राजाने मनःपूर्वक केले होते. व्रताची सांगता करण्याचा दिवस जवळ जवळ येऊ लागला, म्हणून राजाने उपवास आरंभला. तीन दिवस राजाने काहीही खाल्ले नाही. द्वादशीचा दिवस येऊन ठेपला. राजाने आदल्या दिवशी गंगेत जाऊन स्नान केले, गंगेची पूजा केली, खूप दानधर्म केले, ब्राह्मणभोजने घातली, पृथ्वीवरच्या सर्वांना संतुष्ट केले. राज्याचा खजिना लोकांकडून अक्षरक्षः लुटवला आणि राजा-राणीने आरंभलेल्या व्रताची सांगता करण्याचा क्षण जवळ आला. शेवटी ते भगवान विष्णुचेच व्रत होते. त्याने भगवान विष्णुची आराधना केली. राजा अंबरिष तर भगवानांचा परमभक्त होता. आपला परम भक्त किती विरक्त वृत्तीचा साधुपुरुष आहे ह्याची प्रत्यक्ष भगवानांना कल्पना होती. ते राजा अंबरिषला प्रसन्न होणार इतक्मयात द्वारपालाने राजाकडे येऊन नम्रपणे सांगितले, ‘राजन ! महषी दुर्वास आपल्या आवडत्या शिष्यगणांसह आलेले आहेत.’
Ad. देवदत्त परुळेकर








