प्रतिनिधी/ बेळगाव
खेळता खेळता विषारी बिया खाल्याने चार मुली अत्यवस्थ झाल्या. सोमवारी दुपारी खणगाव बी.के. (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मधू नागराज दिंडलकुंपी (वय 6), सान्वी मारुती दिंडलकुंपी (वय 3), सीमा बसवराज होसमनी (वय 6), दिव्यश्री नारायण दिंडलकुंपी (वय 7, सर्व रा. खणगाव बी.के.), अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
ही चारही मुले घराजवळ खेळत होती. त्यांचे कुटुंबिय कामानिमित्त शेतवडीला गेले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काळी बियाणे खाल्यामुळे या मुलांना उलटय़ा होवू लागल्या. तातडीने शेताला गेलेल्या त्यांच्या पालकांना ही माहिती देण्यात आली. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.









