बुलंदशहरमधील घटना : 15 जणांवर उपचार सुरू
बुलंदशहर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुलंदशहर येथील सिकंदराबाद तालुक्मयातील जीतगढी येथे ही दुर्घटना घडली. येथील तब्बल 20 जणांना अचानक विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपास व चौकशीअंती विषारी दारूमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी ग्रामस्थांनी अबकारी विभाग आणि दारू विपेत्यांच्या संगनमतामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे. विषारी दारू प्यायल्यानंतरच त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारांदरम्यान पाच जण मृत्युमुखी पडले. तर 15 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱयांची प्रकृती गंभीर असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणी जीतगढी पोलीस स्थानकातील संबंधित पोलीस अधिकाऱयांना निलंबित करण्यात आल्याचे समजते.









