ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तरप्रदेशच्या अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 108 जणांचा बळी गेला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीला आज सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक करण्यात आली आहे. ऋषी शर्मा असे या आरोपीचे नाव असून, तो भाजपचा नेता असल्याची माहिती मिळत आहे.
अलीगडमध्ये विषारी दारू प्रकरणाचा तपास वेगाने होऊ लागल्यानंतर माफियांनी जवां आणि अकराबाद येथील कालव्यात ही विषारी दारु ओतून देण्यात आली होती. कालव्यातील ही दारु प्यायल्यामुळे आणखी काही लोकांनी आपला जीव गमावला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला शर्मा काही दिवसांपासून फरार होता. शर्मा याच्या जवां ठाण्याच्या क्षेत्रातील फार्महाऊसवर शनिवारी प्रशासनाने जेसेबीच्या सहाय्याने कारवाई केली. अखेर आज शर्माला बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक करण्यात आली.









