ऑनलाईन टीम / मुंबई :
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी एका हल्लेखोराला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे.
दरम्यान, विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची रविवारी हत्या करण्यात आली होती. रणजीत बच्चन रविवारी सकाळी 6.30 वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यावेळी अज्ञांतानी दुचाकीवरून येत बच्चन यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. या गोळीबारात त्यांच्यासोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले. तर रणजीत बच्चन यांच्या डोक्मयात गोळी लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यु झाला होता.
दरम्यान, तब्बल पाच दिवसांनी आज बच्चन यांच्या हल्लेखोराला अटक करण्यात यश मिळाले आहे. मुंबई पोलीस आणि विशेष तपास पथकानं ही कारवाई केली. आरोपीला लखनौ पोलिसांच्या हवाली केलं जाणार आहे.









