प्रतिनिधी / बेळगाव
बाबरी विध्वंसप्रकरणी सर्व आरोपींची बुधवारी निर्देष मुक्तता करण्यात आली. या निर्णयाचे स्वागत करीत बेळगाव विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी विजयोत्सव साजरा केला. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्यवाहक विजय जाधव, शहर अध्यक्ष
डॉ. बसवराज भागोजी, सेक्रेटरी हेमंत हावळ, उपाध्यक्ष प्रशांत राणे, सहकोषाध्यक्ष कृष्णा भट, अर्जुन रजपूत, आनंद कर्लिंग, सुनील कणेरी, वैभव काविलकर, रवी कलघटकर, बसवराज गाणगी, देवेंद्र नाईक, कन्हैया जंबाली व कार्यकर्ते उपस्थित होते.









