वृत्तसंस्था / टोकियो
यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आलेली विश्व जलतरण स्पर्धा आता जपानमधील फुकुओका येथे 13 ते 29 मे 2022 साली होणार असल्याची घोषणा विश्व जलतरण संघटनेच्या नियंत्रण समितीने सोमवारी केली.
चालू वर्षीच्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणारी टोकियो ऑलिंपिक क्रीडास्पर्धा कोरोना महामारीमुळे एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. दरम्यान विश्व जलतरण स्पर्धा 16 जुलै ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता पण ऑलिंपिक आणि विश्व जलतरण स्पर्धेच्या तारखा एकाचवेळी येत असल्याने आता विश्व जलतरण स्पर्धा 13 ते 29 मे 2022 साली घेण्यात येणार आहे. सदर माहिती फिनाचे अध्यक्ष मॅगलिओनी यांनी दिली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा 23 जै 2021 रोजी सुरू होणार असून त्यानंतर पॅरा ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन टोकियोत 24 ऑगस्ट 2021 रोजी उद्घाटन होणार आहे.









