जागतिक श्रवण दिनानिमित्त आयोजित शिबिरात 60 रुग्णांची मोफत तपासणी
प्रतिनिधी / बेळगाव
अलीकडे चुकीच्या पद्धतीने श्रवण करणे, मोबाईलचा अधिक वापर करणे, डीजेसारख्या आवाजांमुळे अनेकांना श्रवणदोष होताना दिसत आहे. याचबरोबर मानसिक तणाव आणि अधिक अपेक्षा यामुळे माणसाच्या बोलण्यावरही परिणाम होताना दिसत आहे. या अधिक अपेक्षांमुळे बोलण्यामध्ये थोतरेपणा वाढत चालला आहे. हे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रेडिओ कॉम्प्लेक्स येथील विश्वा स्पेशल एज्युकेशन सेंटर आणि हेअरिंगच्यावतीने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
जागतिक श्रवण दिनानिमित्त बुधवारी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये वावरताना स्वतःवर थोडासा आवर घाला. त्याचबरोबर तणावमुक्त जीवन जगा, असे सांगितले. यासह संबंधितांना विविध प्रकारचे व्यायामदेखील करण्याबाबत संचालक किशोर जगदाळे आणि बंकट पवार यांनी मार्गदर्शन केले.
मोबाईल हेडफोनचा वापर देखील टाळण्याबाबत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. कारण सतत हेडफोन वापरल्यामुळे कानाच्या पडद्यांवर परिणाम होऊ शकतो. यातून बहिरेपणा येवू शकतो. तेव्हा याबाबत तरुणांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे त्यांनी उपस्थित असलेल्या रुग्णांना सांगितले. या शिबिराला चांगला प्रतिसाद
मिळाला.









