ला नुसिया (स्पेन) : आयबीए 2022 च्या पुरुष आणि महिलांच्या युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा मुष्टीयोद्धा तसेच विद्यमान आशियाई युवा चॅम्पियन विश्वनाथ सुरेशने 48 किलो वजनगटात विजयी सलामी देताना आयर्लंडच्या पॅट्सी थेडीचा पराभव केला.
चेन्नईचा 17 वर्षीय विश्वनाथ सुरेशने 48 किलो वजन गटातील सलामीच्या लढतीत मंगळवारी आयर्लंडच्या थॅडीचा 3-2 अशा गुणफरकाने पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. जॉर्डनमध्ये झालेल्या आशियाई युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने 7 सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्यामध्ये विश्वनाथ सुरेशने सुवर्णपदक मिळवले होते. स्पेनमधील या स्पर्धेत 63.5 किलो वजन गटात भारताचा वनसेज आणि 75 किलो वजन गटात दीपक यांच्या लढती होणार आहेत.









