वारणानगर / प्रतिनिधी
राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात विश्वनाथराव जाधव – सरनाईक यांनी मोठे योगदान दिले आहे. विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी राहील अशा शब्दात राज्याचे सहकारमंत्री नाम.बाळासाहेब पाटील यांनी आदरांजली वाहीली.
बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते,केडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष व पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथराव शंकरराव सरनाईक (वय ८५) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.त्यामुळे बहिरेवाडी येथे त्यांच्या कुटुंबियांची नाम. पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सरनाईक, इंजिनिअर आण्णासाहेब सरनाईक यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेवून विचारपूस केली. यावेळी शाहूवाडी – पन्हाळ्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनीही सरनाईक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट दिली.
यावेळी नाम. पाटील यांनी विश्वनाथराव सरनाईक यांनी सुरूवातीच्या काळापासून गावाबरोबरच परिसर आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि विकास कामांच्या योजनांचे कौतुक केले. सामाजिक,सहकार, शैक्षणिक,कृषी आणि राजकीय कार्यात देखील त्यांनी मोठे योगदान दिल्याचे सांगून सरनाईक आणि आमचे कुटुंबांचे अगदी घरचे संबंध असल्यांचे सांगितले. कोरोनाच्या महामारीस सर्वजण मोठ्या धैर्याने तोंड देत असून त्याला रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहनही नाम.पाटील यांनी बोलताना केले.
यावेळी वारणा दूध संघाचे संचालक एच.आर.जाधव, साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव, उद्योजक सुभाष पाटील, सरपंच शिरीष जाधव ,उपसरपंच तानाजीराव सरनाईक आदी उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,उपमुख्यमंत्री नाम अजित पवार,मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख,जयंत पाटील, सतेज पाटील,राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी राज्यपाल डॉ.डी.वाय, पाटील,आमदार पी.एन. पाटील,माजी मंत्री जयवंतराव आवळे, विलासराव पाटील -उंडाळकर,भास्करराव जाधव, प्रतिक पाटील, कॉग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील,महाराष्ट्र कॉग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील मंत्रीमंडळासह विविध पक्षांचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दूरध्वनीवरून विश्वनाथ सरनाईक यांना आंदरांजली वाहून कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बहिरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथे राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कै.विश्वनाथराव सरनाईक यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब सरनाईक, आण्णासाहेब सरनाईक व कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार डॉ.विनय कोरे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
Previous Articleकोरोनामुक्त ग्राम योजना राबविणार : जयंत पाटील
Next Article माजी मंत्री राम शिंदे यांचा आटपाडी दौरा









