दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून विश्रृत स्टायकर्स संघाने साईराज वॉरियर्सचा 4 गडय़ांनी तर गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाने आनंद चॅलेंजर्सचा 5 गडय़ांनी पराभव केला. मध्यमगती गोलंदाजीवर गडी बाद करणारे रोहित ढवळे (विश्रृत टायकर्स), ऋषिकेश राजपूत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 9 गडी बाद 125 धावा केल्या. वैभव कुरीबागीने 1 षटकार व 4 चौकारांसह 28, विनोद देवगडीगाने 3 चौकारांसह 18, नंदन शिंदेने 17, आकाश असलकरने 2 चौकारांसह 26 धावा केल्या. विश्रृततर्फे रोहित ढवळेने 36 धावांत 4 हार्दिक कांटेने 22 धावांत 2 तर दर्शन मयेकरने व दीपक राक्षे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रृत स्टायकर्सने 21.3 षटकांत 6 गडी बाद 126 करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. सिद्धार्थ गोदवाणीने 3 षटकारांसह 34, दर्शन मयेकरने 5 चौकारांसह 40, रविचंद्रन उकलीने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा केल्या. साईराजतर्फे मुदसर नाशीरने 21 धावांत 3 तर आकाश असलकरने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात आनंद चॅलेंजर संघाने प्रथम फलंदाजी करताना 22.5 षटकांत सर्वबाद 134 धावा केल्या. ध्रृव देसाईने 3 चौकारांसह 27, जेनित मुडबागीलने 2 चौकारांसह 25, ज्ञानेश होनगेकरने 1 षटकार 2 चौकारांसह 18, शुभम नागेशने 15 धावा केल्या. गणेश ज्वलेर्सतर्फे ऋषिकेश राजपूतच्या भेदक व अचूक टप्यावरील गोलंदाजीमुळे आनंद चॅलेंजर संघाचे खंदे फलंदाज गारद झाले. ऋषिकेशने 20 धावांत 3, ओमकार वेर्णेकरने 19 धावांत 2, शुभम उमाजीने 21 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघाने 24.2 षटकांत 5 गडी गडी बाद 135 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला,. व्यंकटेश शिराळकरने 4 चौकारांसह 46, केंदार उसुलकरने 3 चौकारांसह 28, अनिष भुषदने 2 चौकारांसह नाबाद 22 तर ओमकार वेर्णेकरने 21 धावा केल्या.
आनंद चॅलेंजरतर्फे गोलंदाजी करताना अदोकष मानवीने 33 धावांत 2, जेनित मुडबागीलने व कैफ मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते यल्लोजी पाटील, उद्योजक प्रवीण उमाजी, मलिक पागद, जयसिंह राजपूत, ऍड. लक्ष्मण पाटील, शिवाजी शिंदे, हुबळी टायगर्स गणेशचे मालक मनिष ठक्कर, विक्रम देसाई यांच्या हस्ते रोहित ढवळे (विश्रृत) ऋषिकेश राजपूत (गणेश हुबळी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गुरूवारचे सामने :1) आनंद चॅलेंजर वि. साईराज वॉरियर्स सकाळी 9.20 वाजता. 2) मिलन वॉरियर्स वि. दैवज्ञ स्पोर्टस् क्लब यांच्यात दुपारी 1.30 वाजता.