प्रतिनिधी / सांगली
सांगलीतील विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर स्ट्रीट लाईट बसण्याची नागरिक जागृती मंचच्यावतीने मागणी केली होती. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मागणीची दखल घेत, विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर स्ट्रीटलाइट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबद्दल नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर आणि परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.








