किंमत 14 हजाराच्या घरात
वृत्तसंस्था/ मुंबई
चीन मोबाईल कंपनी विवोने आपला नवा विवो वाय 21ए हा स्मार्ट फोन बाजारात दाखल केला आहे. मिडनाईट ब्ल्यू व डायमंड ग्लोइन या दोन रंगात सदरचा फोन येणार असून रेडमी नोट 10, पोको एमथ्री व इनफिनिक्स नोट 11एस या फोन्सना टक्कर देईल, असे सांगितले जातेय.
सदरच्या फोनची किंमत 13 हजार 990 रुपये असणार आहे. 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसह हा फोन विवो इंडिया ई-स्टोअर व सर्व भागीदार रिटेल स्टोअर्सवर विक्री करण्यात येत आहे. याआधी कंपनी वाय 21 ई हा फोन दाखल केला होता, ज्याची किंमत 12 हजार 990 रुपये इतकी होती. 6.5 इंचाच्या एचडी डिस्प्लेसह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा यात असेल.
वैशिष्टय़े
?
6.51 इंच एचडी प्लस हॉलो डिस्प्ले
? इनसेल टेक्नॉलॉजीयुक्त
? ऑक्टा-कोअर मीडियाटेक हिलीयो पी 22 प्रोसेसर
? 5000 एमएएचची बॅटरी, 18 डब्ल्यूची फास्ट चार्जिंग सुविधा
? पंट सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल









