वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विवो कंपनीने भारतीय बाजारात आपला कमी बजेटमधील ‘वाय 1 एस’ स्मार्टफोन सादर केला आहे. या अगोदर फक्त 2 जीबी रॅम असणारा फोन बाजारात कंपनीने आणला होता. 32 जीबी स्टोरेजसह येणारा हा फोन दोन रंगात उपलब्ध होणार आहे. दरम्यान कंपनीने जुन्या वाय 1 एस आणि वाय 12 एस या फोनच्या किमती वाढविल्या आहेत.
विवो वाय 1 एस किमत
विवो वाय 1 एस 3 जीबी रॅम फोनची किमत ही 9,490 रुपये राहणार असून सदरचा फोन ऑरोरा ब्लू आणि ओलिव ब्लॅक कलर आदींमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची विक्री ऍमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक, विवो इंडिया ई स्टोर आणि बजाज इएमआय स्टोअर्सवर उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
वैशिष्ठय़े
s स्मार्टफोनमध्ये डबल नॅनो सिम
s अँड्रॉईड 10 बेस्ट फनटच 10.5 ऑपरेटिंग
s 6.22 इंच एचडी डिस्प्लेची सुविधा
s ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी 35 प्रोसेसर
s 13 एमपी प्रायमरी कॅमेरा









