अटी लादल्याने नागरिकांची गोची : धुमधडाक्मयात लग्न समारंभासाठी तयारी चालविलेल्यांची निराशा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रसार वाढल्याने आता पुन्हा विवाह सोहळय़ांना नाईट कर्फ्यू आणि विपेंड कर्फ्यूचे ग्रहण लागले आहे. पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याची अट घालण्यात आल्याने नागरिकांची गोची झाली आहे. धुमधडाक्मयात लग्न सभारंभ करण्यासाठी तयारी चालविलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून निमंत्रण देण्यासाठी धावपळ करणाऱया नागरिकांनी विवाह सोहळय़ांच्या परवानगीकरिता मनपा कार्यालयात गर्दी केली होती.
कोरोनामुळे मागील वषी शुभमंगल कार्यातही अडथळे निर्माण झाल्याने बहुतांश विवाह सोहळे लांबणीवर टाकण्यात आले होते. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाची परवानगी घेऊन विवाह सोहळे आयोजित करण्यास प्रारंभ झाला होता. पण आता पुन्हा कोरोना विषाणूंचा प्रसार वाढल्याने राज्य शासनाने नाईट कर्फ्यू व विपेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांच्या कालावधीत विवाह सोहळय़ांची तारीख ठरविलेल्या वऱहाडी मंडळींची गोची झाली आहे.
एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या कालावधीत मोठय़ा प्रमाणात विवाह सोहळे पार पडतात. त्यामुळे विवाह तारीख व मुहूर्त ठरविल्यानंतर कार्यालय बुकिंग करण्यात येते. त्यामुळे विवाह समारंभांकरिता असंख्य नागरिकांनी कार्यालये बुकिंग केली आहेत. तसेच बॅन्ड, मंडप, विद्युत रोषणाई आदांकरिता नागरिकांनी ऍडव्हान्स दिले आहे. दि. 23 आणि 24, 25, 26 एप्रिल रोजी विवाहाचे मुहूर्त असल्याने असंख्य विवाह सोहळे आहेत. मागील वषी कोरोनामुळे विवाह सोहळा लांबणीवर टाकलेल्यांनी धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पाडण्यासाठी जय्यत तयारीही केली आहे. पण त्यांच्या अपेक्षांवर नाईट कर्फ्यू व विकेंड कर्फ्यूचे पाणी फेरले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात निराशा झाली आहे.
कोरोनाचा प्रसार वाढला असून देशात कोरोना बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या राजधानीत रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने राज्य शासनाने बुधवार दि. 21 एप्रिल ते 4 मेपर्यंत नाईट कर्फ्यू व विपेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण अन्य व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सभा-समारंभ, विवाह सोहळय़ांवर अटी घालण्यात आल्या आहेत.
केवळ 50 पाहुणे मंडळांच्या उपस्थितीत विवाह सोहळय़ाकरिता परवानगी देण्यात येत आहे. 50 पाहुण्यांहून अधिक नागरिकांची गर्दी झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याकरिता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात अनेक विवाह असून शनिवार-रविवार पूर्णपणे कर्फ्यु लागू करण्यात आल्याने विवाह सोहळय़ांकरिता परवानगी मिळविण्यासाठी नागरिकांनी बुधवारी महापालिका कार्यालयात गर्दी केली होती. केवळ पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ कसा आयोजित करायचा, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
संभ्रम दूर, तरीही…

लोकसभा पोटनिवडणुकीवेळी रॅली काढण्यात आली, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावेळी कोरोनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. पण नागरिकांनी विवाह सोहळय़ांसाठी मंगल कार्यालयांकरिता ऍडव्हान्स दिले आहे. पाहुणे मंडळीला निमंत्रणे दिली आहेत. विविध तयारीकरिता मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. असे असताना विवाह सोहळय़ांना परवानगी देणार नसल्याचे सांगण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. पण पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत विवाह सोहळय़ासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती दशरथ पवार यांनी दिली.
तहसीलदारांकडून मिळणार परवानगी
सरकार तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबतची मार्गसूची जारी केली आहे. यामध्ये विवाह व विविध समारंभांना उपस्थितीबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून परवानगी घेऊनच विवाह व इतर कार्यक्रम करावेत, असा आदेश देण्यात आला आहे. मात्र, परवानगी कोणाकडून घ्यायची याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांनी पत्रक काढून विवाह आणि इतर समारंभांसाठी संबंधित तालुक्मयांच्या तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.
परवानगी न घेता कोणीही विवाह किंवा इतर समारंभ केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कोविड संसर्ग नियंत्रणासाठी सरकारने हा आदेश बजावला आहे. आदेशाचे प्रत्येकाने पालन करणे महत्त्वाचे आहे. कोणीही या आदेशाचे उल्लंघन करत असेल तर त्याला सर्वस्वी आयोजक जबाबदार असतील, असेही म्हटले आहे.
विवाह किंवा इतर समारंभ करताना अटींचेही पालन केले पाहिजे. कार्यक्रमाला अधिक व्यक्ती आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. हे कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात येतात तसेच ज्या व्यक्ती मंडप घालतात त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
विवाह सोहळे-समारंभ कॅमेऱयात कैद
विवाह किंवा इतर समारंभाच्या ठिकाणी मार्शल तैनात केले जाणार आहेत. ते मार्शल आणि त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी विवाह सोहळा तसेच समारंभाचे चित्रीकरण करणार आहेत. व्हिडिओग्राफरसह नोडल अधिकारी यावर नजर ठेवणार आहेत. कोविड मार्गसूचीचे उल्लंघन केले तर तातडीने त्या ठिकाणी तो कार्यक्रम रोखला जाणार आहे. कोविडसंदर्भात जे नियम घातले आहेत, त्या नियमांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. कोविडचा संसर्ग वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा आयोजकांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी केले आहे.









