गोडोली / प्रतिनिधी :
कोरोनाचा कहर आटोक्यात येण्यासाठी सर्वांचे लसीकरण होण्याची गरज आहे. त्यासाठी इतरत्र होणारी गर्दी आणि करावी लागणाऱ्या प्रतिक्षेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. म्हणून आ. शिवेंद्रराजेंच्या सहकार्याने विलासपूर, गोडोलीतील नागरिकांसाठी लवकरच लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
सध्या कोरोना संसर्गीतांची आकडेवारी कमी होऊ लागली असली तर आजार आटोक्यात आला नाही. यासाठी प्रतिबंधक लस हि प्रत्येक नागरिकांला घ्यावी लागणार आहे. सध्या मर्यादित लसीकरण केंद्र आणि तिथे होणाऱ्या गर्दीमुळे नागरिक हैराण होत असल्याने समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. आमदारांनी तत्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विलासपूर आणि गोडोलीतील नागरिकांसाठी कायमस्वरूपी लसीकरण केंद्र सुरू करण्यास सांगितले.