प्रतिनिधी / पेडणे
पेडणे तालुक्मयात आतापर्यंत मिळालेल्या कोरोना पाॕझिटिव्हचा आकडा शतकाजवळ पोचला आहे. पेडणे तालुक्मयात रविवारी दिवसभरात एक कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण विर्नोडा येथे सापडला. हा रुग्ण म्हापसा येथील आझिलो जिल्हा इस्पितळात कामाला असतो. त्यामुळे पेडणे तालुक्मयात आतापर्यंत एकूण 95 रुग्ण संख्या झाली आहे. तालुक्मयात वाढती कोरोना रुग्णांची संख्या ही नागरिकांमध्ये भितीचे वातावरण सध्या तयार होत असल्याने कोरोना लागण होऊ नये यासाठी जरी नागरिकांमध्ये जागृती झाली असली तरी कामानिमित्त तसेच नागरिक विविध ठिकाणी जात असतात. त्या ठिकाणी अनेकांच्या संपर्कात आल्यानंतर ही लागण होत असल्याने आता पेडणेतील सरकारी कर्मचारी तसेच खाजगी आस्थापनात कामाला असलेल्या कर्मचाऱयांमध्ये भिती निर्माण झाली आहे.









