कोल्हापूर/प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या सर्व आर्थिक संस्थेचा गैरवापर करून महाविकास आघाडीला राजकीय ब्लॅकमेक करण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. विरोधी पक्ष संपुष्टात आणण्यासाठी केंद्राकडून लोकशाही धोक्यात घालून काम सुरू आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (former cm prithviraj chavan) यांनी करत कोल्हापूरची ही निवडणूक अस्मितेची लढाई आहे. केंद्राचा अतिरेक रोखण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ही निवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) व्हायला हवी. ही लढत वैचारिक होण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर होत आहे. असे चव्हाण म्हणाले.
कोविड काळात सरकारवर खूप अडचणी आल्या, पण महाविकास आघाडीने अत्यंत धिराने लढत दिली. सरकार अस्थिर करण्यासाठी खूप काही घटना घडल्या, पण अडीच वर्षे महाविकास आघाडी मजबूत आहे, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.
सरकार अडचणीत आणण्यासाठी सरकारी यंत्रणेचा कसा वापर केला जातोय. पण प्रचंड बहुमताने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार पुढे पाच वर्षे काम करेल. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
कोल्हापूरकरांच्या अस्मितेची ही लढाई आहे. ती वैचारिक पद्धतीने लढावी. ही निवडणूक कोल्हापूरकरांना मान्य नाही. भाजपचे वाढते अस्तित्व आणि कोल्हापुरात निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानले जाते. यात भाजपचा पराभव झाला तर त्याबाबत पंतप्रधान मोदींना माहिती मिळेल. त्यामुळे भाजपच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. पण स्वाभिमानी जनता ही जागा दाखवून देईल.
वाढत्या इंधनदरामुळे जनता हैराण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जीडीपीचा दर पहिला तर तो घसरलेला आहे. इंधन दरावर मोदी सरकारने या सात वर्षे २४ लाख कोटी गोळा केले आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.
केंद्र सरकारच्या अख्यारीत असलेल्या आर्थिक संस्थेचा ससेमिरा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमागे लावला आहे. इतक्या कारवाई केल्या, पण अंतिम कारवाई झाल्या का? असा सवाल चव्हाण यांनी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. त्यामुळे लोकशाही धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे रोखण्यासाठी काँग्रेस या निवडणुकाला सामोरे जात आहे, असे चव्हाण म्हणाले.
विरोधक पक्ष संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक संस्थेचा गैरपवापर करून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. हे असेच सुरू राहील तर रशियासारखी वेळ यायला उशीर लागणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचा आरोप हास्यास्पद
पेटीएमवरून पैसे वाटणार असल्याचा चंद्रकांत पाटलांचा (chandrakant patil) आरोप हा हास्यास्पद आहे. जर असे पैसे वाटले तर पुरावे तुम्हाला मिळतील. यावर तुमच्या हातात सर्व संस्था आहेत. तुम्ही कारवाई करा, असा टोला चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.