सोलापूर, सातारा जिल्हयातही अतिवृष्टी पाहणी करणार
प्रतिनिधी/आटपाडी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे मंगळवार आणि बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते जिल्हा दौऱ्यावर येत असुन दोन दिवसाच्या दौ-यात जत, आटपाडी, सांगली, इस्लामपुर येथे ते भेटी देणार आहेत.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमिवर पुणे व सोलापुर जिल्हयात सोमवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर पाहणी करणार आहेत. इंदापुर, माढा, पंढरपूर तालुक्यात पाहणी केली जाणार आहे. मंगळवारी सकाळी अक्कलकोट तालुक्यात पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला जाणार आहे.
मंगळवारी सोलापूर येथून जत तालुक्यातील उमदी येथे दुपारी साडेतीन वाजता विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे आगमन होणार आहे. तेथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करून ते आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे येणार आहेत. तेथे नुकसानीची पाहणी करून आटपाडीतून झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. बुधवारी सकाळी ते झरे येथुन अनुसेमळा, माडगुळे, लेंगरेवाडी, तडवळे, करगणी, बनपुरी, मिटकी तलाव, खानापुर तालुक्यातील करंजे येथे भेटी देवुन ते शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजता तासगाव तालुक्यातील पेड, कवठेएकंद येथे भेटी देवुन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा घेणार आहेत. त्यानंतर इस्लामपुर येथे सायंकाळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भेट देवुन ते सातारा जिल्ह्यात रवाना होणार आहेत. गुरुवारी सातारा जिल्ह्यातील जावळी, कारीव, गाजवडी येथे पाहणी करून सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी दुपारी अतिवृष्टीबाबत चर्चा करून आढावा घेणार आहेत.
त्यानंतर वाई, महाबळेश्वर, राजपुरी, आब्रळ, चिखली येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या भागांना भेटी देवुन शेतकऱ्यांशी, लोकाशी संवाद साधुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माहिती घेणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








