प्रतिनिधी / दापोली
गणेश विसर्जन घाटात वादाचा नसलेला विषय बनवून फुकटची प्रसिद्धी मिळवणाऱ्या विरोधकांना त्यांची हार अद्याप पचवता आली नसल्याची टीका दापोली नगरपंचायतीचे स्वच्छता समिती सभापती मंगेश राजपुरकर यांनी तरुण भारतशी बोलताना केली.
दापोली शहरातील आसऱ्याचा पूल येथे गणपती विसर्जन घाटात दापोली नगरपंचायतीने कृत्रिम गणेश कुंडाची स्थापना केली होती, मात्र याला विरोध करून दापोलीतील लोकांना लोकांच्या भावना भडकावून काही लोकांनी फुकटची प्रसिद्धी लाटण्याचा प्रयत्न केला. असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला वास्तविक पाहता येथे उभारण्यात आलेला गणेश विसर्जन घाट त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. यामुळे ठेकेदाराला पूर्ण रक्कम अदा करण्यात आलेली नाही सदर कामाची पाहणी करून सदर कामाची अभियंत्यांकडून पाहणी करुन याबाबतचा अहवाल सभागृहाला देण्यात यावा असा ठराव या यापूर्वी करण्यात आलेला आहे.
यामुळे हे विरोधकांना कदाचित माहीत नसावे या तलावाच्या सुशोभीकरणासाठी आ. योगेश कदम यांच्या प्रयत्नांनी सुमारे 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे येत्या काळात या विसर्जन घाटाचे सुशोभीकरण व उर्वरित कामे देखील पूर्ण होईल असा विश्वास राजपुरकर यांनी बोलताना व्यक्त केला.
गेले सलग पाच-सहा वर्षे शहरातील आसऱ्याचा पूर येथील गणपती विसर्जन घाट येथे विसर्जन करण्यात येत होते मात्र आता काही लोकांना त्यांचा पराभव पचवता न आल्याने लोकांच्या भावना भडकवण्याचे काम सुरू असल्याचे देखील राजपुरकर यावेळी बोलताना म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









