बेंगळूर : विरशैव-लिंगायत समुदायाचा मागासवर्ग यादीत समावेश करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. याच उद्देशाने शनिवारी बेंगळूरमध्ये विरशैव-लिंगायत मठाधीशांची सभा आयोजित करण्यात आली आहे. बेंगळूरच्या विजयनगर येथील श्री बसवेश्वर सुज्ञान मंटपमध्ये ही सभा होणार आहे. राष्ट्रीय विरशैव-लिंगायत मठाधीशांच्या संघटनेमार्फतही ही सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवयोग मंदिरचे अध्यक्ष होस्पेटचे जगद्गुरु, शैलपीठाचे स्वामीजी, सिद्धगंगा मठाचे मठाधीश, उज्जैनी मठाचे स्वामीजी हे या सभेचे नेतृत्व सांभाळणार आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण यासह विविध राज्यातील विरशैव-लिंगायत मठांचे मठाधीश तसेच गुरु-विरक्त परंपरेतील सुमारे 500 हून अधिक मठाधीश यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय विरशैव-लिंगायत मठाधीशांच्या संघटनेच्या वतीने विभुतीपूर मठाचे डॉ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, सर्पभूषण मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी, कंचुकल बंडे मठाचे बसवलिंग स्वामीजी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









