विमा कंपन्यांतर्फे वाहनधारकांना जर पॉलिसी वर्षात अपघात झाला नाही किंवा विमा कंपनीकडे दावा करण्यात आला नाही तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना वाहनधारकाचे कौतुक म्हणून ‘नो क्लेम बोनस’ देण्यात येतो. पण आरोग्य विमाधारकांनी जर त्यांची तब्येत सांभाळली तर त्यांनाही पॉलिसी वर्षात दावा न दाखल केल्यास प्रोत्साहन म्हणून ‘नो क्लेम’ बोनस देण्यात येतो. आता या प्रोत्साहनपर ‘रिवॉर्ड’मध्ये वाढ करण्यात आली आहे. विमा कंपन्यांकडे आरोग्य विमा पॉलिसींमार्फत जमा होणाऱया उत्पन्नापेक्षा संमत केलेल्या दाव्यांचे म्हणजे खर्चाचे प्रमाण जास्त असते.
वैद्यकीय उपचारांसाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे यातून दिलासा मिळण्यासाठी लोक वैद्यकीय विमा (मेडिक्लेम) उतरवितात. पण विमाधारकांनी योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त रहावे यासाठी विमा कंपन्यांनी ‘रिवॉर्ड’ देण्यास सुरुवात केली. परिणामी विमा कंपन्यांच्या खर्चावर आळा बसणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीआय)ने याबाबत एक परिपत्रक काढून पॉलिसीधारकांनी तब्येत कशी राखावी व सुधारावी, याचे मार्गदर्शन केले आहे.
पॉलिसीधारकांना तब्येत तंदुरुस्त राखण्याबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल ‘रिवॉर्ड पॉईंट्स’ देणार आहेत. याची माहिती देणारे क्लॉज पॉलिसीत नमूद करण्यात येणार आहेत. याचीही पूर्ण माहिती पॉलिसीधारकांना दिली जाणार आहे. पॉलिसीधारकांच्या तंदुरुस्तीबाबतचे निकष ठरविणारी यंत्रणा तसेच पॉलिसीधारक योग्य काळजी घेतात की नाही? याचे योग्य मूल्यमापन करणारी यंत्रणा विमा कंपन्यांना उभारावी लागणार असून यासाठी येणारा खर्च विमा कंपन्यांनी स्वतः सोसायचा की पॉलिसीधारकांकडून वसूल करावयाचा? याबाबतचा निर्णय अजून आयआरडीआयने जाहीर केलेला नाही.
‘रिवॉर्ड’ म्हणून ओपीडी उपचारांवर सवलत देण्यात येईल. हेल्थ चेकअप तसेच वेगवेगळय़ा चाचण्या केल्या जातात, त्यांच्या खर्चात सवलत देण्यात येईल. हेल्थ सप्लिमेंट, योगा केंद्र, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब, फिटनेस सेंटर येथे कराव्या लागणाऱया खर्चावर सूट देणारी व्हाऊचर्स पॉलिसीधारकांना देण्यात येतील. पॉलिसीची रक्कम वाढविताना आतापर्यंत विमा कंपन्या बरेच निकष लावत असत. विशेषतः ज्ये÷ांना पॉलिसीची रक्कम वाढवून दिली जात नसे. पण यात ती ठरविलेल्या तंदुरुस्तीच्या निकषात पॉलिसीधारक बसत असेल तर देण्यात येईल. प्रिमियममध्येही सवलत दिली जाईल. प्रिमियमची रक्कम बरीच मोठी असते. यात पाच टक्के जरी सवलत मिळाली तर ती रक्कम बऱयापैकी होऊ शकते. काही आजारांना विमा संरक्षण दिले जात नाही. ते दिले जाण्याचा पर्यायही देण्यात येईल. आरोग्य विमा हा व्यवसाय विमा कंपन्यांना नफा कमवून देणारा नसून सामाजिक बांधिलकी म्हणून चालविला जातो.
सदरच्या ‘रिवॉर्ड’ योजनेतून विमा कंपन्या आणि पॉलिसीधारक अशा दोघांचाही फायदा होण्याचे संकेत निर्माण होत आहेत. विमा कंपन्यांचे दाव्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी त्यांचा तोटा कमी होईल. लोकांच्या तंदुरुस्तीचे प्रमाण वाढल्यामुळे ते खुष असतील. पॉलिसीधारकांनी ‘रिवॉर्ड’ योजना व्यवस्थित समजून घ्यायला हवी व पॉलिसीधारकांना ती सहजपणे समजूक घेण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यांनी उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.
– शशांक गुळगुळे









