इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक विमान उद्योग महामारीमधून सावरण्यासाठी 2024 पर्यंतचा कालावधी लागणार असल्याची माहिती असून यामध्ये विमान प्रवाशांची संख्या 55 टक्क्मयांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अगोदरच्या अंदाजामध्ये चालू वर्षातील प्रवासी संख्या 46 टक्क्मयांनी घटण्याचे संकेत व्यक्त केले होते.
जागतिक विमान कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनातून हा उद्योग सावरण्यास अजून कालावधी लागणार असून पूर्वीप्रमाणे प्रवासी संख्या होण्यास 2024 चे वर्ष उजाडावे लागणार असून अन्य उद्योगधंदे संकटात असल्याने यातून पूर्णपणे सावरण्यासाठी अधिक काळ लागणार आहे.
इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या एका अहवालानुसार अमेरिका व विकसित देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होण्यास संथपणे सुरुवात होणार असून क्यावसायिक प्रवासात तेजी येण्यासाठी विलंब होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. कारण जूनमध्ये विमान प्रवाशांची संख्या वर्षाच्या आधारे 86.5 टक्क्मयांनी घसरली आहे.









