नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलाची मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घट करण्यात आली होती. पण आता कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसते आहे. तरीही येणाऱया काळात हवाई इंधन दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी ‘आयसीआरए’ने वर्तवला आहे. कोरोनाचा जगभरातील देशांना फटका बसला असून निर्मिती प्रकल्प कारखाने वेगाने काम करत नसल्याचे दिसून आले आहे. कच्च्या तेलाच्या किमती मध्यंतरी नीचांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. जागतिक अर्थव्यवस्थेतील हालचाली अद्यापही मंदावलेल्या असल्याने विमान इंधन दरात कोणतीही वाढ अपेक्षित नसल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाचा दर 19 रुपये डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला होता. त्यामुळे विमान कंपन्यांना इंधनाचे दर कमी करणे भाग पडले. त्यानंतर मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत गेली. आता दर 44 रुपये डॉलर प्रति बॅरल आहे. मध्यंतरी जुलैमध्ये विमान इंधन दरात 24 टक्के वाढ करण्यात आली आणि पाठोपाठ ऑगस्टमध्ये पुन्हा 4 टक्के इतकी वाढ करण्यात आली. अलीकडच्या काळामध्ये स्थानिक विमान वाहतुकीत वाढ झाली आहे. पण सध्या तरी इंधन दरात वाढ केली जाणार नसल्याची शक्मयता एजन्सीने वर्तवली आहे.









