एनसीसी छात्र प्रशिक्षणावेळी पटियाला येथे दुर्घटना,
वृत्तसंस्था/ पटियाला
पंजाबमधील पटियालामध्ये मायक्रो लाईट विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये पायलट ग्रुप कमांडर जी. एस. चीमा यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारा एनसीसीचा छात्र बिपिनकुमार यादव गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आर्मी कॅम्प रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
पटियालातील संगरुर रोड परिसरातील एनसीसी छात्रांना सिव्हील एव्हिएशन क्लबच्या मदतीने विमान उड्डाणाविषयी प्रशिक्षण दिले जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. यामध्ये विंग कमांडर आणि एक छात्रसैनिक जखमी झाला. दोघांनाही त्वरीत रुग्णालयात दाखल केले. परंतु विंग कमांडर चीमा यांचा मृत्यू झाला. जखमी छात्रसैनिक पटियालातील महिंद्रा शासकीय महाविद्यालयामध्ये शिकत होता.









