परुळे / प्रतिनिधी:
परुळे चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाकडे जाणारा पिंगुळी पाट रस्ता खराब झाल्याने जिल्ह्यातील राजकारणी ” ट्रोल ” विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेले बॅनर ठरताहेत लक्ष्यवेधी ….
चिपीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचे ” वैभव ” नको रे ” विनायका ” ….
बहुचर्चित ठरलेल्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ तारखेला होवू घातले आहे . या पार्श्वभूमीवर विमानतळ कोणी मंजूर केले ? निधी कोणी आणला ? यावरुन सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार श्रेयवाद रंगला आहे.मात्र ऐन उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेली पोस्टर्स येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे
विमानतळाचे उद्घाटन काही दिवसावर येवून ठेपले असले तरी त्या ठीकाणी जाणारा रस्ता मात्र खड्डेमय आहे . हाच धागा पकडुन राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे बॅनर ठीकठीकाणी दिसत आहेत.यात रस्त्यावरील खड्ड्याचा विकास नक्की कोणासाठी , मानापमान नाटकात राजीचा दिवस करणारे , खड्डयाच्या वैभवाचे श्रेय घेतील का , बारशे , मुंजी , म्हाळासाठी धावणाऱ्या पुढाऱ्यांची खड्ड्यामुळे गणेशाकडे पाठ , चिपी एअरपोर्टवर जाण्यासाठी खड्डेमय रस्त्यावरुन प्रवासाची सुवर्णसंधी अशा आशयाचा मजकुर त्या ठीकाणी लिहीण्यात आला आहे हे बॅनर नेमके कोणी लावले याबाबत माहीती मिळू शकली नसली तरी , उदघाटनाच्या तोंडावर त्याठीकाणी जाणारा खड्डेमय रस्ता मात्र चर्चेचे कारण बनला आहे.
Previous Articleलोकसंख्येनुसार आरक्षण शक्य
Next Article गोव्यातून दोडामार्गात येणाऱ्या कदंबा बसेस अचानक बंद









