प्रतिनिधी / मालवण:
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी चिपी विमानतळाला भेट दिली. स्थानिक उमेदवार यांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे यासाठी युवकचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी निवेदन दिले.
स्थानिक लोकांनाच विमानतळावर संधी भेटली पाहिजे, असे निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे. यावेळी विमानतळ व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात आली. बाहेरील उमेदवारांना येथे नोकरीसाठी संधी न देता स्थानिक जिह्यातील उमेदवारांनाच नोकरीसाठी संधी मिळाली पाहिजे. यावेळी व्यवस्थापक पाटील यांनी स्थानिक उमेदवारांनाच संधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, नोकरीसाठी उमेदवार सुभाष गावडे, दुर्वेश गावडे शुभम गावडे, विनायक लाड उपस्थित होते.









