नवी दिल्ली
विप्रो कंपनीने ब्राझिलची आयटी कंपनी आयव्हीआयए सर्व्हिसीओ डी इंफॉरमिटिकाचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. यामध्ये विप्रोने या अधिग्रहणाची घोषणा जुलै महिन्यातच केली आहे. सदरच्या कंपनीसोबत एकूण व्यवहार 169 कोटी रुपयांचा आहे. आयव्हीआयए ब्राझिलमध्ये ग्राहकांसोबत सिस्टम डेव्हलपमेंट आणि परियोजनाशी संबंधीत सेवांचा यात समावेश होतो. विप्रोने शेअर बाजाराला अधिग्रहणाबाबत माहिती दिली आहे. या व्यवहारामुळे आगामी काळात व्यापार वाढीस मदत होणार असल्याचा विश्वास विप्रोकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.









