उदय सावंत / वाळपई
पश्चिम घाटाचा समृद्ध इतिहास सांगणाऱया सत्तरी तालुक्मयात हल्लीच्या काळात मोठय़ा प्रमाणात लोकवस्तीमध्ये साप घुसण्याचे प्रकार वाढू लागले आहे .यामुळे सध्या तरी सर्पमित्रांची जबाबदारी वाढली आहे. सतरी तालुक्मयात एकेकाळी साप पकडणे ही कठीण बाब होती. आता मात्र सर्पमित्रांच्या चांगल्या सहकार्यामुळे नागरिकांच्या भितीवर उत्तम प्रकारचा उपाय निघालेला आहे. सत्तरी तालुक्मयात आज अनेक सर्पमित्र निस्वार्थी भावनेतून काम करताना दिसत आहेत .प्राणी बचाव संघटनेचे सर्व सभासद आहेत .यापैकी ठाणे पंचायत क्षेत्रातील पाली या ठिकाणी वास्तव्य करणारे विनोद सावंत यांनी आतापर्यंत जवळपास 1800 पेक्षा जास्त साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. यात 29 किंग कोब्रा 200 स्पँ क्टिकल कोब्रा यांचा खासकरुन समावेश आहे. विनोद सावंत हे पाल येथील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच त्यांना जनावरांना जीवदान देण्याचे सवय लागली. त्यानंतर त्यांनी गोव्यातील आघाडीचे सर्पमित्र अमृतसिंग यांच्याकडे काही प्रमाणात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी खऱयार्थाने साप पकडण्याच्या कार्याला सुरुवात केली
आतापर्यंत 1600 सांपाना जिवदान.
यासंबंधी विनोद सावंत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आतापर्यंत 1600 सापाना जीवदान दिले आहे. तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता त्याने स्वतःची पदरमोड करून सापाला जीवदान दिले आहे .अनेकवेळा जे साप पकडण्यात येत असतात त्यावेळी नागरिक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देतात हेच आपल्यासाठी मोठे बक्षीस असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली. वेळ व काळ याचे भान न ठेवता साफ पकडण्याची प्रक्रिया आतापर्यंत आपण केलेली आहे. गेल्या सात वर्षापासून सापांना जीवदान देण्याचे कार्य आपल्या हातून होत आहे. यामुळे निसर्गाची एक प्रकारे सेवाच करण्याचे कार्य असल्याचे यावेळी ते म्हणाले.
29 किंग कोब्रा पकडून जिवदान.
गेल्या सात वर्षांत आपण 29 किंग कोब्रा पकडले व त्याला जीवदान दिले. यदाकदाचित हे किंग कोब्रा पकडले नसते तर ते आज जैविक संपत्तीमधून ते नष्ट झाले असते. पैकी जास्तीत जास्त किंग कोब्रा हे घरांमध्ये घुसले होते. यामुळे संबंधित घरातील कुटुंबाची दैनावस्था झाली होती. अशाच प्रकारे सर्पमित्र आज चांगल्या प्रकारे योगदान देत असल्याचे विनोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जवळपास 200 स्पँक्टिकल कोब्रा यालाही जीवदान दिल्याचे विनोद सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले
13.50 लांबीचा किंग कोब्रा.
आतापर्यंत आपण 13.50 फूट लांबीचा किंग कोब्रा पकडला आहे. सदर किंग कोब्रा सर्वात लांब होता. याच्या व्यतिरिक्त कमी लांबीचे किंग कोब्रा पकडून त्याला जीवदान देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पकडण्यात आलेल्या स्पँक्टिकल कोब्रा पैकी दीड मीटर कोब्रा सर्वात लांब होता असे यावेळी त्यांनी सांगितले .आतापर्यंत कठीण प्रसंगाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की हिवरे येथील एका झाडावर किंग कोब्रा होता .त्याला पकडण्याची मोठी जोखीम होती. मात्र सदर झाडावर चढून त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता त्याला पकडण्याची केलेले कार्य आजही माझ्या मनात ताजे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सापाला जीवदान देणे आज तर गरजेचे आहे .निसर्ग सृष्टीमध्ये जैविक विविधता जगण्यासाठी साप हा महत्त्वाचा घटक असतो. यामुळे त्यांना नष्ट करून जैवविविधतेमध्ये खंड पडणार नाही याची प्रत्येकाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. साप दिसल्यास किंवा अडथळा निर्माण होत असल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे विनोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले









