ऑनलाईन टीम / मुंबई :
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाजूला गेलेले भाजपचे अनुभवी नेते विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज संघटनात्मक पातळीवरील काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची धुरा देण्यात आली आहे. बिहारमधील ऋतुराज सिन्हा व झारखंडमधील आशा लाकडा यांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून तर भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.









