नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची स्टार महिला मल्ल विनेश फोगट हिच्या उजव्या ढोपरावर बुधवारी शस्त्रक्रिया केली गेली. बुधवारी तिने ट्वीट करत शस्त्रक्रियेची माहिती दिली.
27 वर्षीय विद्यमान आशियाई चॅम्पियन विनेश फोगट हिने 31 ऑगस्ट रोजी वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रायलमधून माघार घ्यावी लागत असली तरी ती दुखापतीमुळे नसल्याचा दावा केला होता. थकवा आल्याचे कारण तिने दिले होते. विनेशला टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने तिला शिस्तीचा भंग केल्याबद्दल निलंबित केले होते.









