नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध
प्रतिनिधी/सांगली
ज्यांच्याकडे निवडणुकीचा कोणताही अजेंडा नाही. कार्यकर्त्यांना मोठे करण्याची दानत नाही, अश्या साखर कारखानदारांना नाकारा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले. पदवीधर मतदारांनी जात बघून मतदार करू नये, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. जितेंद्र शिंदे, प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारानिमित्त डॉ. आंबेडकर सांगलीत आले होते. पुढे बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, पुणे पदवीधर मतदार संघातून भाजप तसेच महाआघाडीकडून लढणारे दोन्ही उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही. एखाद्या कार्यकर्त्याला मोठे करण्याची दानत नाही. या उलट वंचितचे उमेदवार अजेंडा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
पदवीधर, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी जात पाहून मतदान न करता वंचितच्या उमेदवारांना मतदान करावे. दोन्ही नाकर्त्या साखर कारखानदारांना नाकारावे. ते म्हणाले, आरक्षित कोट्यातील जागा २५ टक्क्यांवर आल्यानेच आरक्षणाबाबत वाद निर्माण झाले आहेत. याबाबत सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रतिसाद मिळत नाही. मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्याला उच्च तसेच सर्वोच्च न्यायालने स्थगिती दिलेली नाही. मात्र पुरोगामीत्वाचा डंका पिटनारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काहीही बोलायला तयार नाही. त्यांच्या अजेंड्यामध्येह याचा उल्लेख नाही. वंचित मात्र सभागृहात याबाबत आवाज उठवेल, असेही डॉ. आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








