प्रतिनिधी / सांखळी
न्हावेली डुरीगवाडा येथील विनायक गांवस यांचे काल दि. 2 जून रोजी गोमेकॉत हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनायक गांवस हे न्हावेली येथील विविधा परिवाराचे संस्थापक सदस्य होते. ते अभिनय नाटय़मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचा कला अकादमीतर्फे गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने विविधा परिवारात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया विविध परिवाराचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रताप गांवस यांनी व्यक्त केली. विनायक गांवस यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.









