प्रतिनिधी / गगनबावडा
सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या संख्येने वाढला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 11 सप्टेंबर पासून 10 दिवसाचा जनता कर्पंयू विविध राजकीय पक्षांनी पुकारला आहे. शासनाकडून वारंवार आवाहन करुनही लोक सोशल डिस्टंसिंग पाळणे व मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरानाचा प्रभाव तालूक्यात वाढू लागला आहे. तालूक्यात समुह संसर्ग वाढू लागल्याने व लोकांनी शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळण्याकडे दुर्लक्ष केल्याने गगनबावडा पोलीसांनी आता अशा व्यक्तींवर दंडाची धडक मोहीम हाती घेतली आहे.
गगनबावडा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता पाटील यानी दंडाची धडक मोहीम आज तालूक्यात राबविली निवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह तालूक्यात 40 लोकांना त्यांनी विनामास्क फिरताना दंड केला. राजकीय पुढा-यांनाही त्यानी विनामास्क फिरताना दंडनीय कारवाईपासून सोडले नाही. त्यामुळे यापुढेही नागरीक विनामास्क फिरताना आढळल्यास त्यांचेवर दंडणीय कारवाई केली जाणार असून नागरीकानी बाहेर पडताना शासकीय नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
Previous Articleपुलाची शिरोलीत चाळीस दिवसात ३२ मृत्यू
Next Article अजूनीमध्ये परग्रहावरील माणसाची गोष्ट









