प्रतिनिधी / गगनबावडा
कोरोना रोगावर मात करण्यासाठी प्रशासनाने विविध मार्ग अवलंबिले जात आहेत. गगनबावडा येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्थानिक व्यापारी वर्गालाही याबाबत सक्त ताकीद दिली आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा वाढता फैलाव चिंताजनक आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्त्वाकांक्षी मोहीमेची कार्यवाही तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. संचारबंदी शिथील केल्यापासून तर ग्रामिण भागात कोरोना बाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. गगनबावडा येथे पर्यटनाच्या निमित्ताने लोकांची गर्दी वाढत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर गेले आठवड्यात साळवन येथे गरवाई केली होती.
काल गनबावडा तालुका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. गगनबावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एस. टी. डेपो, ग्रामपंचायत कार्यालय, परशुराम विद्यालय, मुख्य बाजारपेठ, करूळ व भुईबावडा घाटमार्ग परिसरात काल धडत मोहिम राबविली. दिवसभरात काल कारवाई पथकाने ४२०० रूपये दंड वसुल केला. मास्क नाही तर माल नाही हे तंत्र व्यापारी वर्गाने वापरण्याविषयी येथील वर्गाला सक्त ताकीद दिली आहे. नायब तहसीलदार वळवी, गटविकास अधिकारी महेश सुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक आर.बी.कुरणे, गावकामगार तलाठी, पोलिस कर्मचारी यांनी ही मोहीम राबवली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









