दंडाच्या पावतीसोबत मास्कही दिले, नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या वाढता प्रादूर्भाव नियंत्रण आणण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ही त्रिसूत्री बंधनकारक केली असताना रेल्वे प्रवासादरम्यान कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.
मे महिन्यात मध्य रेल्वे पुणे विभागाच्या विविध रेल्वे स्थानकांवर विनामास्क प्रवास करताना आढळल्याने 322 प्रवाशांकडून 1 लाख, 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाईनंतर प्रवाशाला केवळ दंडाची पावती न देता मोफत मास्क देऊन कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.








